♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

घरगुती सिलेंडरचा  भीषण स्फोट; दैव बलवत्तर म्हणून कमलाबाई वाचल्या  ! गावकऱ्यांनी केली धावाधाव… शेगाव तालुक्यातील घटना

MH 28 News Live / शेगाव : तालुक्यातील वरखेड बुद्रुक या गावात २४ मे रोजी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. घरगुती वापराच्या गॅस सिलींडरचा अचानक स्फोट झाल्याने संपूर्ण घराला आग लागली. या घटनेत सुमारे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कमलाबाई सुखदेव शिरसाट या आपल्या राहत्या घरात स्वयंपाक करत असताना गॅस सिलींडरने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि घरातील सर्व वस्तूंना वेढले. आग इतकी भीषण होती की घरातील सगळ्या वस्तू जळून खाक झाल्या.

घटनेनंतर गावकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले व आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. वेळेवर उपाययोजना झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रशासनाकडून पंचनामा करून नुकसानीचे अंदाजे एक लाख रुपये इतके प्रमाण नोंदवण्यात आले आहे.

या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून गॅस वापरताना खबरदारी घेण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने अशा प्रकारच्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती आणि सुरक्षेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129