
महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी – जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
MH 28 News Live, बुलडाणा : ज्या संस्थेत १० पेक्षा जास्त कर्मचारी आहे, त्या ठिकाण अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक केले आहे. अंतर्गत समिती स्थापन न करणाऱ्या कार्यालयांचे परवाना रद्द किंवा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यास मनाई करण्यात येईल. सदर अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व कार्यवाही सर्व कार्यालय प्रमुखांनी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन २९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत नारी शक्ती पुरस्कार प्राप्त कु. वनिता बोराडे, महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी, प्रा. अनुजा सावळे, विष्णू आव्हाळे आदी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे आयोजन जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात व इतर खाजगी क्षेत्र, एंटरप्रायजेस, सहकारी संस्था, क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, मॉल्स, अशासकीय संघटना, ट्रस्ट, रूग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, वाणिज्य, शैक्षणिक, औद्योगिक कार्यालयांसाठी करण्यात आले. याप्रसंगी सर्पमित्र वनिता बोराडे यांना नारी शक्ती पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. अनुजा सावळे यांनी पॉस्को ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मनोगत व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील कलम २६ नुसार जर एखाद्या मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, कलम १३, १४, २२ नुसार कारवाई केली नसल्यास कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रूपयापर्यंत दंड करण्यात येणार आहे. हाच प्रकार पुन्हा घडल्यास परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे. याबाबत कार्यशाळेत प्रशिक्षण तालुका संरक्षण अधिकारी रामेश्वर वसु यांनी दिले. कार्यशाळेला महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, गणराज फाऊंडेशनचे पदाधिकारी आदींसह विविध कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या. संचलन श्रीमती तायडे यांनी तर आभार प्रदर्शन दादाराव चव्हाण यांनी केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button