♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्वेताताईंची विकासकामे जाती – धर्मांत भेदभाव न करणारी; आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी काढले प्रशंसोद्गार…

MH 28 News Live, अमडापूर : लोकप्रतिनिधी हा निवडून आल्यानंतर सर्व जनतेचा असतो . एका विशिष्ट पक्ष जात किंवा पंथ याचा विचार न करता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी तळागाळातील सर्वच जनतेची कामे करने लोकशाहीला अपेक्षित आहे. परंतु चिखली विधान सभा मतदार संघातील मागील लोकप्रतिनिधी यांनी केवळ जातीचे आणि सुड बुद्धीचे राजकारण केले. त्यासोबतच मागील लोकप्रतिनिधी विकास कामे करताना सुद्धा त्यांच्या विचाराच्या लोकांच्या गावात किंवा गल्लीतच विकास कामे केले. परंतु  आ. श्वेताताई महाले यांनी आता पर्यंत पक्ष, जात, धर्म, पंथ न पहाता जो येईल त्याचे काम समाजातील शेवटच्या घटकांचा विकास करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, सोबतच त्या जाती पक्ष विरहित विकास कामे करत असल्याचे प्रशंसोद्गार नरहरी गवई जिल्हा अध्यक्ष आर पी आय यांनी काढले.

अमडापूर येथील ६ कोटी रुपये किमतीच्या रस्ता बांधकाम करण्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. चिखली विधानसभा मतदारसंघात ६ कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामाचा भूमिपूजन २० फेब्रुवारी रोजी आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले.

या विकासकामांमध्ये अमडापूर लव्हाळा अमडापूर लव्हाळा दुसरबीड रामा २२२ किमी १०२ ते ११० रस्ता सुधारणा करणे, किंमत ६ कोटी २० लक्ष, ठिकाण अमडापूर बल्लाळ देवी मंदिर या रस्ता विकासकामांचा समावेश आहे.

विकासाभिमुखच राजकारण करणार – आ महाले

मी जनतेची सेवा करण्यासाठी राजकरणात आलेली आहे. राजकारणा शिवाय विकास होत नाही हे जरी खरे विकासात राजकरण करणे हे लोकप्रतिनधीच्या कर्तव्याच्या विरूद्ध असल्याचे माझे मत आहे. त्यामुळेच मी केवळ आणि केवळ विकासा भिमुखच राजकारण करणार असल्याचे प्रतिपादन आ श्वेताताई महाले यांनी यावेळी केले.

या सोहळ्यास , डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, बबनराव गोर्‍हे अध्यक्ष जगदंबा पतसंस्था, बंडू अंभोरे जिल्हा सचिव युवा मोर्चा, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, शाहिद पटेल माजी उपसभापती, राम जाधव जिल्हा सचिव किसान आघाडी, प्रशांत पाखरे शहराध्यक्ष भाजप प्रवीण खंडेलवाल भाजपा तालुका उपाध्यक्ष, अर्जुनराव नेमाडे माजी तालुका प्रमुख शिवसेना, गजानन सर देशमुख भाजपा युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष, शाहिद पटेल माजी सरपंच, श्रीमती ललिता ताई माळोदे माजी सरपंच, गजानन चोपडे अध्यक्ष सोसायटी, हाफीजभाई खासाब उपाध्यक्ष सोसायरी, नंदकिशोर जुमडे रमेश देढे गजानन जाधव किसान मोर्चा ता. उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर आणा देशमुख किसान मोर्चा शहर अध्यक्ष, संजय गवई गणेशराव माळोदे शिवराम देशमुख, माधवराव देशमुख माजी शहर अध्यक्ष, अक्षय आदमाने शहराध्यक्ष युवा मोर्चा, गजानन देशमुख, नंदकिशोर जुमडे, गणेश माळोदे, गजानन जाधव, रवी पाखरे, अंनता शेळके, दीपक झाडे, अनिल शेळके, पवन दायजे, अशोक जाधव, श्रीकांत गीऱ्हे,राम देशमुख, गजानन चोपडे यांच्यासह आयोजक सरपंच वैशालीताई गवई सरपंच अमडापूर, तथा भाजप / शिवसेना / पाई आठवले गट / रासप / शिवसंग्राम / प्रहार तसेच मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समस्त सर्व सदस्य ग्राम पंचायत व गावकरी मंडळी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Check Also
Close
Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129