
डाकूच्या नातवाचा IAS अधिकारी होईपर्यंतचा प्रवास – देव तोमर यांची प्रेरणादायी कहाणी
MH 28 News Live : देव तोमर हे चंबळच्या गुन्हेगारी इतिहासात प्रसिद्ध असलेल्या डाकूंच्या कुटुंबातून आलेले एक यशस्वी IAS अधिकारी आहेत. त्यांच्या आजोबा रामगोविंद सिंह तोमर हे एक काळचे कुख्यात दरोडेखोर होते. मात्र देवने या गुन्हेगारी वारशावर मात करत समाजसेवेसाठी स्वतःचा मार्ग शोधला.
IIT पासून फिलिप्स कंपनीपर्यंत – सुरुवातीचा प्रवास
देव तोमर यांनी IIT रोपड येथून इंजिनिअरिंग पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी नेदरलँड्समधील ‘फिलिप्स’ कंपनीत वैज्ञानिक म्हणून वार्षिक ₹88 लाख पॅकेजवर नोकरी केली. हे स्थान सोडून UPSC सारख्या कठीण परीक्षेचा मार्ग त्यांनी निवडला.
UPSC: सातत्य, संघर्ष आणि अंतिम यश
2019 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली. तीन प्रयत्नांत इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले, पण अंतिम यादीत नाव आले नाही. अखेर 2025 च्या चौथ्या प्रयत्नात AIR 629 मिळवून IAS अधिकारी झाले.
जीवनसाथीची साथ: यशामागे पत्नीचा वाटा
UPSC च्या तयारीदरम्यान, देव यांच्या पत्नीने नोकरी करत आर्थिक पाठबळ दिलं आणि देवला पूर्णवेळ अभ्यासासाठी संधी दिली. त्यांची साथ आणि समजूतदारपणा ही देखील या यशाची एक महत्त्वाची कारणं आहेत.
IAS अधिकारी म्हणून सध्याचं स्थान
देव तोमर हे आता IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. IAS अधिकाऱ्यांचं प्रारंभिक वेतन ₹56,100 प्रति महिना असून, त्यावर विविध भत्ते आणि सरकारी सुविधाही मिळतात. फिलिप्समधील कोट्यवधींच्या पॅकेजच्या तुलनेत हे वेतन कमी असलं, तरी समाजसेवेची भावना त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे.
“पार्श्वभूमी महत्त्वाची नाही, दृष्टिकोन महत्त्वाचा!”
देव तोमर यांची कहाणी सिद्ध करते की कोणत्याही पार्श्वभूमीतून आलेली व्यक्ती, जर निर्धार आणि मेहनतीने काम करत असेल, तर ती उच्चतम यश मिळवू शकते. त्यांचा प्रवास आज लाखो तरुणांना प्रेरणा देणारा आहे.