♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” तू इथे कशासाठी आलास ” चौघांनी त्या युवकाला केली बेदम मारहाण देऊळगाव महीत गुन्हा दाखल

MH 28 News Live / देऊळगाव राजा : मित्राला बोलविण्यास गेलेल्या युवकास ” तू इथे कशासाठी आलास ” असे बोलून लाठीकाठीने मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी देऊळगाव मही येथील चौघा विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी अमोल शिंगणे वय ३६ राहणार देऊळगाव मही हा त्याचे मित्राला आणण्यासाठी घटनास्थळावर गेला असता चौघा आरोपींनी संगणमत करून तू येथे कशासाठी आला असे बोलून लाठीकाठीने तसेच चपटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. यासंदर्भात अमोल तेजराव शिंगणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी किशोर राजेंद्र शिंगणे, रामेश्वर वसंतराव शिंगणे, नंदकिशोर सुरेश पाबळे व गणेश चव्हाण या चौघा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला. या संदर्भात बीट जमादार कलीम देशमुख तपास करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129