
‘ चैत्र पाडवा पहाट ‘ चे २ एप्रिलला आयोजन; नववर्षाच्या सुरेल स्वागतासाठी विवेकानंद शिकवणी परिवाराचे आयोजन
MH 28 News Live, चिखली : मागील तेरा वर्षांपासून चिखलीकरांच्या मराठी नववर्षाची पहिली पहाट सुरेल पद्धतीने साजरी करणाऱ्या विवेकानंद शिकवणी परिवाराच्या वतीने आयोजित ‘ चैत्र पाडवा पहाट ‘ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. २ एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजता एस. पी. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलेले आहे.
विवेकानंद शिकवणीणी वर्गाच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या आगमनाप्रित्यर्थ गेल्या १३ वर्षांपासून संगीतमय मेजवानी मिळत आली आहे. २००७ ते २०१९ या १३ वर्षाच्या कालखंडात ‘चैत्र’ पाडवा पहाट’ च्या निमीत्ताने महाराष्ट्रातील अनेक नामवंत गायकांनी आपले गायन सादर केले. २०२० आणि २०२१ मध्ये आलेल्या
कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष कार्यक्रम साजरा करता आला नाही. परंतु, या वर्षी २ एपिल शनिवारला गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ४.३० ला विदर्भातील नामवंत गायकांच्या गोड गळ्यातून ” केंव्हा तरी पहाटे ” हा सुरेल कार्यक्रम सादर होणार आहे. गायकांमध्ये संगीत अलंकाराची तयारी करत असलेल्या वैष्णवी रिंढे, करणसिंग राजपूत आणि वैशाली आराख या सुप्रसिद्ध गायकांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध निवेदक चंद्रशेखर जोशी हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
कार्यक्रमाची सूरवात शास्त्रीय रागदारीने केली जाईल, त्यानंतर अभंग, भावगीते, भक्तीगीते, गौळण, चित्रपटगीने इ. गीत प्रकार सादर होतील. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ठिक ४ . ३० वाजता एस. पी. एम. महाविद्यालयाच्या भव्य | प्रांगणात सपंन्न होणाऱ्या या कार्यक्रमास चिखली शहरातील तसेच शहरानजिकच्या परिसरातील सर्व रसिकांनी उपस्थित राहून या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन भागवत इरतकर सर यांनी केले आहे.



