
ब्रेकिंग न्यूज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडविण्याची धमकी ! दोन संशयितांना अटक; दोघेही देऊळगावमहीचे
MH 28 News Live / बुलढाणा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखा आणि बुलढाणा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मंगेश अच्युतराव वायाळ (३५) आणि अभय गजानन शिंगाणे (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते दोघेही देवळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जिल्हा – बुलढाणा येथीलह रहिवासी आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आले आहे.