
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यीकरण कामाचे आ. फुंडकरांच्या हस्ते पिंप्री देशमुख येथे झाले लोकार्पण
MH 28 News Live, खामगाव : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण पिंप्री देशमुख येथे आ अँड. आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते २ एप्रिल रोजी सायंकाळी पार पडले.
पिंप्री देशमुख येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर स्वछ, सुंदर व आकर्षक असावा यासाठी गावातील शिवप्रेमी युवकांनी आ. अँड आकाश फुंडकर यांचेकडे निधीची मागणी केली होती. यांची ही मागणी आ. फुंडकरांनी मान्य केली. व ३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यांच्या प्रयत्नातून पुतळा सौंदर्यीकरणचेआकर्षक काम पूर्णत्वास गेले. काल या कामाचे लोकार्पण आ. फुंडकरांच्या शुभहस्ते पार पडले. सर्वप्रथम आ फुंडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यांचेसह भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया सहसंयोजक सागर फुंडकर, डॉ एकनाथ पाटील, पप्पूसेठ अग्रवाल, पं. स. सदस्य विलास काळे, उपसरपंच स्वातीताई बोंडे, शंकर होनाळे, ग्रा प सदस्य सुनील कौळकर, भैय्या अमलकार, वासुदेव टिकार, मधुकर मोळे, सहदेव फुंडकर, गजानन थोरात , मोहन काळे, राजू काळे, शिवाजी वनारे, आत्माराम कोल्हे, आदी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आ आकाशदादा फुंडकर, सागरदादा फुंडकर यांचेसह मान्यवर मंडळींचा पिप्री देशमुख गावकऱ्यांचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की या जयघोष करीत गावकऱ्यांनी आ फुंडकरांचे आभार मानले.



