
डोणगाव येथे महावीर जयंती उत्साहात झाली साजरी
MH 28 News Live, डोणगाव : जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान श्री महावीर यांची जयंती डोणगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आली. यानिमित्त सकाळी आठ वाजता भगवान महावीरांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेच्या समोर फेटा व नऊवारी नथ घातलेल्या तसेच आधुनिक स्कुटीवर बसलेल्या श्राविकांचे पथक होते. सहभागी महिलांनी जैन ध्वजामध्ये असलेल्या पंचरंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. घोड्यावर बसून असलेल्या श्राविका सरिता आंबेकर यांनी विशेष वेषभूषा केली होती. या शोभायात्रेत नवयुवकांचा उत्साह विशेष ओसंडून वाहत होता. ” जिओ और जिने दो ” च्या घोषणा शोभायात्रेत दुमदुमत होत्या. श्री दिलीप सातपुते व जयचंद बोराळकर यांनी पूजन, अभिषेक, भजन यथासांग केले. ठीकठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था धोंगडे परिवारातर्फे कुल्फीची व्यवस्था केलेली होती . पंकज आंबेकर व राहुल आंबेकर यांनी महाप्रसादाची धुरा समर्थपणे सांभाळली. सामाजिक ऐक्याचे दर्शन व ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत केले.
महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला भजन संध्या व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. विघ्नहर विद्यासागर सेवादलाच्या युवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. पोलीस प्रशासनही सकाळी सात वाजल्यापासून शोभायात्रेच्या सोबत होते. शांततेच्या वातावरणात शोभायात्रा संपन्न झाली.



