♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कांँग्रेस आमदार जिग्नेश मेवानी यांची अटक बेकायदेशीर. चिखली तालुका व शहर कॉग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा

MH 28 News Live, चिखली : वडगाम गुजरात येथील भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना पोलीसांनी तीन दिवसापूर्वी अटक करून आसामला नेले, त्याठिकाणी आमदार मेवानी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. आमदार मेवानी यांना झालेली अटक ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असुन लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणारी आहे. अश्या आशयाचे निवेदन चिखली तालुका व शहर कॉग्रेसच्या वतीने चिखली तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्यात आले असुन आमदार मेवानी यांची त्वरीत सुटका करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात चिखली तालुका व शहर कॉग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुजरात मधील वडगामचे कॉग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलीसांनी गुजरात मधील पालनपुर सर्कीट हाउस येथुन तीन दिवसापुर्वी रात्री 11 : 30 वाजेच्या सुमारास बेकायदेशिरपणे अटक करून त्यांना आसामला घेवून गेले. आसाममध्ये त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून आमदार जिग्नेश मेवानी यांना पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या नावाने एक ट्वीट केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने देशाच्या पंतप्रधानांच्या नावाने काही अपेक्षा करणारे ट्वीट करणे हा काही अपराध नाही. लोकशाही व संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र दिलेले आहे. परंतु गुजरात सरकारने मनमानीपणे सर्व नियम कायदे धाब्यावर बसुन आमदार जिग्नेश मेवानी यांच्यावर अटकेची कारवाई केलेली आहे. ही अटक बेकायदेशीर असून लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणारी आहे. आ. जिग्नेश मेवानी यांची त्वरीत सुटका करण्यात यावी. अशी चिखली तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. अन्यथा चिखली तालुका व शहर कॉग्रेसच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहेे.

निवेदन देते वेळी चिखली तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर सुरूशे, तालुका किसान सेलचे अध्यक्ष समाधान गिते, भास्करराव धमक, सुरेंद्र खपके, बिदुसिंग इंगळे, अजाबराव इंगळे, श्याम सावंत, ज्ञानेश्वर पंचागे, विष्णू सोळंकी, राहुल खपके, अंकुश गुंजकर, सुरेष गुंजकर, रामराव गायकवाड, पंढरी क्षीरसागर, विष्णु सोळंकी, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिीती होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129