♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दरोडे, जबरी चोरी, रस्ता लुटमार करणारी आंतरजिल्हा अट्टल सराईत गुन्हेटोळी बुलडाणा पोलीसांच्या ताब्यात

MH 28 News Live, धामणगाव बढे : रोहीणखेड येथील सोने चांदीचे व्यापाऱ्याचे डोळ्यात दीवसा ढवळ्या मिर्ची पुळ टाकुन लुटणारी ७ जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडली आहे. यातील तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने अश्या अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असे म्हणता येईल.

मोताळा तालुक्यातील रोहीणखेड येथील सोन्या चांदीचे ज्वेलर्स विजय नारायण सुरपाटणे हे को-हाळा बाजार येथील अलंकार ज्वेलरी दुकान बंद करुन नेहमी प्रमाणे दि. २८ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान रोहीणखेडकडे निघाले होते. तेथे या घटनेतील आरोपी पाळत ठेवुन हा. लालमाती ते रोहीणखेड रस्त्यावर सुरपाटणे एकटे असल्याची संधी मिळताच डोळ्यात मिर्ची पुळ टाकुन व मारहाण करीत विजय सुरपाटणे जवळील ३ लाख ७६ हजाराचे सोन्या चांदीचे दागीन्यांसह रोख रक्कम हिसकावली. या घटनेची फिर्याद धामणगाव बढे पो.स्टे ला दिली असता पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द अप क्रं ८१/ २०२२ कलम ३०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. जि. पो. अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्था. गु. शाखेचे पो. नि. बळीराम गिते यांना सदर गुन्हा उघडकिस आणण्याचे सुचीत केले होते. या गुन्ह्यातील घटनेचे गांभीर्य पाहता गिते यांनी ‘ कानुन के हात लंबे होते है ‘ या उक्तीनुसार तपासचक्राला गती देत स्था. गु शाखेच्या पथकासह धा. बढे येथील पथकाने गुन्ह्यातील तपासात प्रथम सि. सि. टी. व्ही फुटेजची पाहणी करुन व गुप्त माहीतीच्या आधारे धाड पो. स्टे अंतर्गत येणाऱ्या जनुना येथील राजेंद्र सुपडा चंडोल व जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथील कृष्णा नारायण मुरडकर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देत या घटनेत एकुण ७ जणांचा समावेश असल्याचे सांगितले. गुन्हा करण्यापुर्वी विजय सूरपाटणे हे सोन्या चांदीचा व्यापारी असल्यावरुन त्याचे जाण्यायेण्याची संपुर्ण माहीती मिळवुन गुन्ह्याचे दिवशी पाळत ठेवुन एकटे असल्याची संधी आरोपींनी साधली. त्यांच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकुन त्यांना लुटल्याचे कबुली दोन्ही आरोपींनी दिली. या गुन्ह्यात सहभागी कृष्णा नारायण मुरडकर रा. वालसावंगी ता. भोकरदन जि.जालना, ताराचंद तुळशीराम कचरे रा. नांदलगाव जि. औरंगाबाद, सुरेश गजानन झाल्टे रा. बोरखेड ता. जि.बुलडाणा, विशाल संतोष वाघ रा. को-हाळा बाजार ता. मोताळा जि.बुलडाणा, मुकेश ओंकार बस्सी रा. तरोडा ता.मोताळा, स्वनील विष्णू गवळी रा. वालसावंगी जि. जालना, राजेंद्र सुपडा चंडोल रा. जनुना ता. जि. बुलडाणा या सदर गुन्ह्यातील आरोपींना दि.२७ एप्रील पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास धा. बढेचे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे करीत आहेत.

सदर घटनेतील आरोपींकडुन दि.२५ एप्रील पावेतो एकुण ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्ह्यातील आरोपी पैकी ३ आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर संपुर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. ताराचंद तुळशीराम कचरे वय ३२ रा. नांदलगाव ता.पैठण जि. औरंगाबाद याच्यावर खुन, १ दरोडा ४ गुन्हे, जबरी चोरी १७ गुन्हे चोरी ४ असे एकुण २६ गुन्हे तर राजेंद्र सुपडा चंडोल रा. जनुना याचेवर दाखल गुन्हे २ घरफोडी गुन्हे चोरी ३ असे एकुण ५ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय कृष्णा नारायण मुरडकर रा. वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना याचेवर जबरी चोरी १ गुन्हा चोरी २ गुन्हे व इतर शरीराविरुध्द व मालमत्ते प्रकरणी २ गुन्हे दाखल असुन सदर कारवाई प्रकरणी प्रमुख मार्गदर्शन जिल्हा पो. अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पो. अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गु शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांचे आदेशाने सपोनि अमित वानखडे,सपोनि मनीष गावंडे, सपोनि धा. बढे पो. स्टेचे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे , पोउपनि निलेश शेळके ,पोउपनि श्रीकांत जिद्दमवार, पोउपनि आशिष गंद्रे ए. एस. आय मधुकर महाजन, पो.हे.काॕ. दीपक लेकुरवाळे, नापोकाॕ गणेश पाटील, विजय वारुळे, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव, पोकाॕ गजानन गोरले, गणेश शेळके, वैभव मगर , पोहेकाॕ सुरेश सोनवणे, शरद बाठे, सुरज रोकडे, धीरज चंदन, राजु आडवे, दामोधर लठाड, महीला पोकाॕ सरिता वाकोडे, वाहन चालक शिवानंद मुंढे, संजय जाधव यांनी आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129