♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘ उन्द्री ‘ आता ‘ उदयनगर ‘ म्हणुन ओळखले जाणार. आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांमुळे केन्द्र सरकारचा ऐतीहासिक निर्णय

MH 28 News Live, उदयनगर ( उन्द्री) : चिखली तालुक्यातील उन्द्री या गावाच्या उदय नगर म्हणुन नामकरण करण्यास केन्द्र सरकारने परवानगी दिल्याने आ. श्वेताताई महाले यांच्या अनेक वर्षाच्या प्रयत्नांना यश आले आहे.

याबाबत जे वेंकटरमन अंडर सेक्रेटरी , विज्ञान आणि प्रोद्योगिकी मंत्रालय, टेक्नॉलॉजी भवन नवी दिल्ली भारत सरकार यांनी ता. चिखली, जिल्हा – बुलडाणा, महाराष्ट्रातील “उंद्री” गावाचे नाव “उदयनगर” असे बदलण्याचा /सर्वे ऑफ इंडियाचा बदल करण्याच्या प्रस्तावावर ” हरकत नसल्याचे ” कळविले आहे. तसेच
“उंद्री” गावाचे “उदयनगर” म्हणून देवनागरी/रोमन लिपीत नवीन नावाचे स्पेलिंग, कसे असावे याबाबत सुद्धा सर्व्हे ऑफ इंडियाने महाराष्ट्र सरकारला,
भारतीय सर्वेक्षणाच्या सर्व्हे जनरल ऑफिस, सर्व्हे ऑफ इंडिया संचालक, महाराष्ट्र आणि गोवा जिओस्पेशिअल डेटा सेंटर, संचालक, नकाशा प्रकाशन,
संचालक नॅशनल जिओस्पेशिअल यांना कळविले आहे. तसेच श्रीमती ललिता हेडाऊ ,अंडर सेक्रेटरी गृह विभाग भारत सरकार यांनी सदर नामकरणा बाबत महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात प्रसिध्दी देण्याबाबत उपसचिव , सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र सरकारला निर्देशित केले आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ” उन्द्री ” गावाचे नामकरण उदय नगर असे करण्याबाबत राजपत्रात प्रसिद्धी करण्यासाठीची कार्यवाही सुरू केलेली आहे.

उंद्री ता. चिखली जि. बुलडाणा या गावाचे नांव उंद्री हे नाव शिवी दिल्यासारखे वाटत असल्या गावाचे नाव ” उंद्री ” ऐवजी उदयनगर करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांच्या वतीन केलेली आहे या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विभागीय आयुक्त अमरावती यांना सादर करण्यात आलेला आहे. तसेच विभागीय आयुक्त अमरावती यांनी प्रधान सचिव महसुल व वन विभाग मुंबई यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आलेला आहे. परंतु सुरुवातीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या पत्र क्र. 130/53 दि. 11/09/1953 अन्वये विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे नसल्याने नव्याने त्रुटी पूर्तता करून प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय यांचे मार्फत सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव परिपूर्ण असल्याने केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला होता.

गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली होती मागणी

उंद्री गावाच्या उदय नगर नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळावी यासाठी आ सौ श्वेता ताई महाले यांनी केंद्राकडे सुद्धा सातत्याने पाठपुरावा केला होता. दि. 6 आणि 7 एप्रिल 2022 रोजी आ श्वेताताई महाले या दिल्ली येथे नवीन निवडून आलेल्या आमदारांच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी गेल्या असता त्यांनी केंद्रिय गृह मंत्री मा ना अमीत भाई शहा यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र देउन उंद्री च्या नामकरण प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली होती.

“उन्द्री” आता ” उदयनगर ” झाल्याने एका नवीन पर्वाचा उदय – आ. श्वेताताई महाले

गत अनेक वर्षापासून ” उन्द्री” गावाचे ” उदयनगर ” नामकरण करण्यासाठी प्रयत्न करीत होते. यासाठी विधान सभेच्या सभागृहात तारांकीत प्रश्न , कपात सूचना , अर्धा तास चर्चा , लक्षवेधी या सांसदीय आयुधांचा यासाठी वापर केला होता. उन्द्री” / ” उदयनगर ” हे गाव मोठे असुन त्याला लागून 30 ते 40 खेडे लागून आहेत . उदय नगर मोठी बाजार पेठ आहे.
” उन्द्री” गावाचे नाव ” उदयनगर ” झाले आहे. या नामकरण कार्यात मला खारीचा वाटा उचलता आला हे माझे भाग्य समजते तसेच ” उन्द्री” आता ” उदयनगर ” झाल्याने एका नव्या पर्वाचा उदय झालेला असल्याची भावनिक प्रतिक्रिया आ. श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी दिली .

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129