
शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले आहे. आ. संजय गायकवाड यांची एवढी उंची नाही की त्यांनी राज साहेबांवर टिका करावी – मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांचे प्रत्युत्तर
MH 28 News Live, चिखली : संपूर्ण महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्या बाबत बोलताना इलेक्ट्रॉनिक मीडियावर टीका केली. त्यांची टीका जर लक्षात घेतली तर शिव सेने ने हिदुंत्वाचा मुदा सोडून दिला आहे अश्या स्वरूपाची टीका जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी केली आहे.
मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी सर्वप्रथम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनीच केलेली होती. कलकत्ता येथील हायकोर्टाने जो भोंगे ऊतरवण्या समंधी जो निर्णय दिला होता त्या निर्णयांची अमलं बजावणी व्हावी ही मागणी आदरणीय बाळासाहेंबानीच केली होती त्यांचाच वारसा व हिंदुत्वाचा मुदा राजसाहेब ठाकरे पुढे घेऊन जात आहे मशिदीवरील भोंगे काढण्यात यावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. भोंगे काढण्याचा मुद्दा हा बाळासाहेबांचाच असल्याने तोच हिंदुत्ववादी विचार राजसाहेबांनी पुढे नेला आहे शिवसेनेने मात्र हिंदुत्व सोडल्याचे दिसून येते.आ. गायकवाड यांना राज साहेबांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसून ते या अगोदर मनसे मध्येच होते. आ. गायकवाड यांनी यापूर्वी मनसेची विधानसभा उमेदवारी घेऊन मनसे च्या नावाखाली दुसऱ्या क्रमांकावर प्रचंड मते मिळवलेली होती. राज साहेबांबद्दल बोलण्या आधी आ. गायकवाड यांनी अगोदर आपली उंची बघावी आपण कोणाबद्दल बोलतोय? काय बोलतोय याचे तारतम्य ठेवावे. आ. गायकवाड यांना मनसेमध्ये प्रवेश घेण्याकरीता फार काळ प्रतीक्षेमध्ये सुद्धा राहावे लागले होते हे त्यांनी विसरून चालणार नाही. याचा साक्षीदार मी स्वतः असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.



