
काँग्रेसच्या राजवटीत आतापेक्षाही महाग होते गँस सिलिंडर; खुद्द राहुल गांधींनी केले मान्य
MH 28 : देशात गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींवरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेहमीप्रमाणे कॉँग्रेसलाच अडचणीत आणले. कॉंग्रेसच्या काळात गॅस सिलेंडरची किंमत आतापेक्षाही जास्त होती. परंतु, कॉँग्रेसचे सरकार करदात्यांचा पैसा अनुदान देण्यात उडवित होते असे राहूल गांधी यांनीच मान्य केले आहे.
राहूल गांधी यांनी एका ट्विटमध्ये दावा केला की 2014 मध्ये काँग्रेसच्या काळात एलपीजी सिलेंडरची किंमत 1,237 रुपये होती. सध्या ही किंमत 999 रुपये आहे. मात्र, ग्राहकांना कॉँग्रेसच्य काळात 410 रुपयांत ग्राहकाला सिलेंडर मिळायचे. त्यावेळी सरकार अनुदानासाठी प्रति सिलिंडर करदात्यांचे 847 रुपये खर्च करत होते. मोदी सरकारने सबसिडी देणे बंद केले. मात्र, ही रक्कम देश घडविण्यासाठी इतर प्रकल्पांसाठी वापरली जात आहे.
महागाई दराचा विचार केला तर कॉँग्रेसच्या काळात 1237 रुपये किंमत असलेल्या सिलेंडरची किंमत 1,950 रुपये आहे. भारतातील महागाई दर 6.65% (2014), 4.91% (2015), 4.95% (2016), 3.33% (2017), 3.95% (2018), 3.72% (2019) आणि 2022 मध्ये 6.62% होता. याच न्यायाने विचार केला तर मोदी सरकार सध्या ग्राहकांना हजार रुपये अनुदान देत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button