टीम इंडियाचा ‘ द वाँल ‘ राजकीय इनिंग सुरू करणार…? राहुल द्रविड राजकारणात येण्याची शक्यता
MH 28 News Live : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे संमेलन हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये 13 ते 15 मे या कालाधीमध्ये होणार आहे. या शिबिराला राहुल द्रविड उपस्थित राहणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपानं सुरू केली आहे. द्रविडची भाजपाच्या शिबिराला उपस्थिती ही याच तयारीचा भाग मानली जात आहे.
राहुल द्रविडसह कुस्तीपटू बबिता फोगट देखील या शिबिराला उपस्थित राहणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशभरातून 139 प्रतिनिधी या शिबिरामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. गांगुलीनंतर द्रविड टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button