
द्वारपोच योजनेचे तीन तेरा; ठेकेदाराचे हलगर्जीपणामुळे शहरवासी धान्यापासून वंचित. दुकानदारांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
MH 28 News Live, जळगाव जामोद : महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे शहरी भागाला थेट द्वारपोच योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचा पुरवठा करण्यात येतो. परंतु संबंधित ठेकेदाराची अरेरावी व हलगर्जीपणामुळे महिन्याचे जळगाव जामोद शहरात या योजनेचे 3 / 13 वाजले आहेत.
मे महिन्याचे 23 दिवस उलटूनही अजून कोणत्याच प्रकारचे धान्य शहरातील नागरिकांना प्राप्त झाले नाही. शहरातील दुकानदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसीलदार यांच्या मार्फत तक्रार केली. या तक्रारीमध्ये नमूद केला आहे की जळगाव जामोद येथील गोदाम पालक खूपसे यांच्याकडे मालाची चौकशीकरिता गेलो असतात खुपासे यांनी सिल्वर रोडलाइन्स यांचे एजंट खामगाव निवासी विशाल चांडक यांना फोन करून शहरी विभागाला धान्य कधी होणार अशी विचारना केली. चांडक यांनी सरळ शब्दात गोदाम पालक यांना सांगितले की ” तुम्ही मला विचारणारे कोण ? माझा नंबर दुकानदारांना द्या त्यांच्याशी मी बोलेल किंवा मला कलेक्टर विचारणा करतील ” अशा प्रकारचे उत्तर दिलं तसेच ठेकेदाराच्या अशा प्रकारच्या अरेरावीच्या भाषा मुळे शहरातील दुकानदार त्रस्त झालेले आहेत कारण शहरातील रेशन कार्डधारक सारखे दुकानावर चकरा मारून उद्धट भाषेत विचारणा करीत आहेत. कार्डधारकांना धान्याचा पुरवठा उशिरा झाल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराला स्वस्त धान्य दुकानदार जबाबदार नसून वाहतूक ठेकेदाराचा प्रतिनिधी जबाबदार आहे. भविष्यात अशा कोणत्याही तक्रारी झाल्यास दुकानदाराला जबाबदार न धरता संबंधित ठेकेदाराला जबाबदार ठरवण्यात यावे व तसेच प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या अगोदर विकत व वीस तारखेच्या अगोदर पी एम के जी वाय मोफत धन्य दुकानदारांना पोच करण्यात यावे अशी विनंती सुद्धा स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने करण्यात आली. यावेळेस स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर दाताळकर, एस जी खिरोडकार, संजय अग्रवाल, दिलीप पाटील, शेख अकील, अजय चांडक, सुभाष राठी यांच्यासह इतर दुकानदार उपस्थित होते.
जळगाव जामोद शहरातील १२०९ शेतकरी कार्डधारक तर प्रधान्य गटाचे ३९०६ लाभार्थी आज रोजी धान्यापासून वंचित असल्याचे समजते. शासनाने या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे तसेच अरेरावीची भाषा करणारे वाहतूक ठेकेदार विरुद्ध कारवाई करण्याची सुद्धा गरज आहे. कारण पुरवठा विभाग आपले काम पूर्ण जबाबदारीने करत आहे परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे पुरवठा विभागाची नाहक जनतेमध्ये बदनामी होत आहे.