परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नर्सिग काँलेजमधील तरुणाने केली चिखलीत आत्महत्या
MH 28 News Live, चिखली : परीक्षेत अपेक्षित गुण मिळाल्यामुळे निराश झालेल्या तरुणाने दि. २ जून रोजी चिखली येथे गळफास लावून आत्महत्या केली. सदर तरुण देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बुद्रुक येथील रहिवासी होता, तो चिखलीच्या अनुराधा नर्सिग महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत होता.
या घटनेबद्दल थोडक्यात माहिती अशी आहे की, देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बु ।। येथील रहिवासी असलेला शिवशंकर भास्कर लाड ( २१ ) हा चिखली येथील अनुराधा नर्सिंग कॉलेजमध्ये तृतीय वर्षाचे शिकत होता. त्याच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार होता. ठरल्याप्रमाणे निकाल जाहीर झाला मात्र, शिवशंकरला अपेक्षित गुण न मिळाल्याने तो निराश झाला होता. दरम्यान आपले सहपाठी मित्र दुपारी एक वाजता काँलेजला गेले परंतु तो मात्र आपल्या खोलीवरच थांबला. काही वेळाने मित्र खोलीवर आले असता खोलीचा दरवाजा आतून बंद आढळला. त्यांनी शिवशंकरला हाका मारल्या मात्र आतून काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडताच आतमध्ये शिवशंकरचा देह फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. लगेच त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथील डाँक्टरांनी शिवशंकरला मृत घोषित केले. या घटनेची चिखली पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button