♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चेक देताना दहा वेळा विचार करा…! बालाजी अर्बनला दिलेल्या धनादेश अनादर प्रकरणी चिखलीत आरोपीस कारावास व दंडाची शिक्षा

MH 28 News Live : स्थानिक चिखली येथील रहीवासी कोकीळा नामदेव खरे यांनी बालाजी अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि., चिखली यांचे कडून घेतलेल्या थकीत कर्जाच्या भरण्यापोटीे यांनी दि.६/४/१७ रोजी संस्थेस इंडियन ओव्हरसिस बँक चिखली या बँकेचा धनादेश क्र.९२९८०१ रु. १,५३,०००/- चा दिला होता.

सदर धनादेश खात्यात पुरेसा निधी नसल्यामुळे न वटवता परत आल्यामुळे बालाजी अर्बन संस्थेने त्यांच्याविरुध्द प्रथम १३८ अन्वये फिर्याद दिवाणी व फौजदारी न्यायालयास चिखली येथे दाखल केली होती. सदर प्रकरणामध्ये दि. ६/५/२०२५ रोजी न्याधयाधिश एच.डी. देशिंणे दिवाणी फौजदारी न्यायालय चिखली यांनी या दाव्यामध्ये संस्थेच्या बाजुने महत्वपूर्ण निकाल दिला.

१३८ एन.आय.अ‍ॅक्ट १८८१ च्या गुन्ह्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७६ च्या कलम २५५/२ नुसार आरोपी कोळीळा खरे यांना दोन महिने साधा कारावास आणि ३,०६,०००/- रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीने फिर्यादी संस्थेस दंडाची रक्कम न दिल्यास वरील प्रमाणे दोन महिने व एक महिना अतिरिक्त असे एकूण तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल असे आदेशात नमुद केले आहे. सदर प्रकरणामध्ये फिर्यादी संस्थेकडून अ‍ॅड. एस.पी.चव्हाण यांनी सर्व काम पाहिले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129