सावळा गोंधळ… आज लागणारा दहावीचा निकाल पडला लांबणीवर
MH 28 News Live : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (SSC Result 2022) शिक्षण मंडळ ने अद्याप SSC निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. अहवालानुसार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड लवकरच निकालाची तारीख जाहीर करतील. निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in वर प्रसिद्ध केले जातील.
दहावीचा निकाल १५ जूनपर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही आठवड्यांपूर्वी तशी माहिती दिली होती. मात्र, निकालाची तारीख निश्चित झाली नाही. आता 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा देण्यास नकार दिला आहे.
शिक्षण मंडळाकडून हाती आलेल्या माहितीनुसार या आठवड्यात निकाल (SSC Result 2022) जाहीर होण्याची अपेक्षा नाही. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड निकालाच्या तारखेच्या एक दिवस आधी तसं जाहीर करणार आहेत; अशी माहिती आहे. यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 10 वी ची परीक्षा दिली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button