
भीम नगरमधील समस्या त्वरीत सोडवा – प्रशांत भटकर यांची चिखली न. प. कडे मागणी
MH 28 News Live, चिखली : दलित वस्ती मध्ये समाविष्ट होणाऱ्या शहरातील भीम नगर परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये उपस्थित झालेल्या रस्त्यांची समस्या आणि स्वच्छतेच्या समस्येला या परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांची त्वरित सोडवणूक नगरपालिका प्रशासनाने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भटकर यांनी नगर पालिकेकडे केली आहे. मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांना दि.. 22 जून रोजी दिलेल्या निवेदनात प्रशांत भटकर यांनी या समस्या मांडल्या असून त्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
वार्ड क्र २१ भीम नगर मधिल मौनी महाराज संस्थानाच्या मागील बाजूस भीम नगर गेट क्र २ पासून बावस्कर यांच्या घरापर्यंत अर्धवट सिमेंन्ट रस्त्याचे काम नगर परिषद अंतर्गत सुरु आहे बावस्कर यांच्या घरापासून अँड. कस्तुरे यांच्या घरापर्यंत अर्धवट राहीलेला सिमेंन्ट रोडचे काम तत्काळ सुरु करण्यात यावे . तसेच क्वाटन मार्केट मागिल बाजुस जाणारी नाली ही भीम नगर गेट क्र.२ पर्यंत चुकीच्या पद्धतीने तयार केल्यामुळे नालीतच पाणी तुंबते पावसाळ्यात पाऊस पडल्याने रहिवाशांच्या घरात पाणी घुसते . पावसाळ्यात साप , विंचु किटुक निघतात करिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी प्रशांत भटकर सामाजिक कार्यकर्ता यानी मुख्याधिकारी नगर परिषद चिखली यांना दि. 22 जून रोजी केली निवेदनाद्वारे केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button