
दिलीप काळे यांना समाजभुषण पुरस्कार प्रदान
MH 28 News Live, चिखली – शहारातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप अंबादास काळे यांना स्व. सोमनाथभाऊ रामजी कांबळे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दि. 06 जुलै रोजी आयोजित कार्यक्रम विश्रामगृह जालना येथे आधुनिक लहुजी सेना मराठवाडा अध्यक्ष संतोष तुपसौंदर , विलास चांदणे, कैलास जाधव, संतोष कांबळे, कैलास जाधव, मोजेस गायकवाड, सुभाष खरात, विकी पाखरे यांच्या शुभहस्ते दिलीप काळे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
फुले, शाहु आंबेडकरी चळवळीचे धडाडिचे कार्य करणारे दिलीप काळे यांचा वेगवेगळी आंदोलने आणि उपक्रमामध्ये व सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. विविध सामाजिक, प्रबोधनत्माक कार्यक्रम घेऊन शोषित वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतात. मातंग समाजाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजाच्या न्याय्य हक्कासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. या कार्याची दखल आधुनिक लहुजी सेनाने घेतली. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संतोष तुपसौंदर मान्यवरांच्या हस्ते दिलीप काळे यांना समारंभपुर्वक समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्व. सोमनाथभाऊ रामजी कांबळे जयंतीनिमित्त हा समाजभुषण पुरस्कार प्रदान करुन आपला गौरव करित आहोत. या पुरस्काराने दिलीप काळेयांचे सर्वच स्तरावरुन अभिनंदन होत आहे.