आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मानव विकास कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत मोफत सायकल वाटप
MH 28 News Live, चिखली : आदर्श विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालय चिखली शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी मानव विकास कार्यक्रम अंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप दि. १३ जुलै रोजी करण्यात आले.
वर्ग ८ ते वर्ग १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींसाठी हे सायकल वाटप योजना आहे. या योजनेसाठी एसी, एसटी प्रवर्गातील आणि दारिद्र्यरेषा कुटुंब प्रमाणपत्र धारक विद्यार्थिनींना प्राधान्य दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शाळेतून सादर केलेल्या विद्यार्थिनींच्या प्रस्ताव पंचायत समिती मार्फत छाननी करून निकष पात्र विद्यार्थिनींची निवड यादी शाळेला प्राप्त झाली. त्यानुसार दि. १२ जुलै रोजी प्राचार्य समाधान शेळके, उपप्राचार्य प्रमोद ठोंबरे , पर्यवेक्षक रवींद्र जाधव, नालींदे यांच्या हस्ते ७ लाभार्थी विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. या योजनेचे प्रमुख अमित कुहिरे यांनी या संपुर्ण प्रक्रीयेचा पाठपुराव करत मुलींना सायकल मिळण्यासाठी मोलाचे सहकार्य करुन कार्यवाही पूर्ण केली तसेच सतिश यंगड यांनी सहकार्य केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button