वृत्तपत्र वितरण करणाऱ्या बांधवांना रेनकोटचे वाटप करून बालाजी अर्बनने जोपासली सामाजिक बांधिलकी
MH 28 News Live, चिखली : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या बालाजी अर्बन परिवारातर्फे गुरुवार दिनांक १४ जुलै रोजी विविध दैनिक वृत्तपत्राचे घरोघरी वाटप करणाऱ्या बांधवांना रेनकोटचे वितरण करण्यात आले.
पावसाळी दिवसात भर पावसात ओले होऊ नये. नियमितपणे रोज सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्या मुलांना रेनकोटचे मोफत वितरण बालाजी अर्बन पतसंस्थेमध्ये करण्यात आले. याप्रसंगी बालाजी अर्बनचे अध्यक्ष मंगेश व्यवहारे, उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा , कार्यकारी संचालक नारायणराव खरात, सुदर्शन भालेराव ,गोपाल शेटे, नारायण भवर ,प्रताप खरात, आनंद जाधव, जुलालसिंग परिहार, पुष्पाताई राजपूत, संध्याताई सावजी, सरव्यवस्थापक अनिल गाडे, सहाय्यक सर व्यवस्थापक अशोक नाईक, रमेश देशमुख, शाखा व्यवस्थापक, अतुल भोकरदनकर व सर्व कर्मचारी बंधू हजर होते. या कार्यक्रमासाठी पत्रकार समाधान गाडेकर, पवन लढ्ढा, ओम खत्री व अनंता गाडेकर हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी बोलताना बालाजी अर्बनचे अध्यक्ष एडवोकेट मंगेश व्यवहारे यांनी सांगितले की ऊन, पाऊस, वारा याची पर्वा न करता घरोघरी वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र वितरकांना पावसापासून संरक्षण व्हावे या हेतूने बालाजी अर्बनच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना पावसाचा एकही थेंब न पडलेले वर्तमानपत्र वेळेत घरी पोहोचवण्याचे काम हे वितरक पार पाडतात. म्हणूनच अशा कर्तव्यदक्ष व कर्तव्यनिष्ठ वृत्तपत्र वितरित करणाऱ्या बांधवांना रेनकोट देण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे संचालक सुदर्शन भालेराव, पत्रकार समाधान गाडेकर, पवन लढ्ढा यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वृत्तपत्र वितरण करणारे संतोष आंबेकर, शेंबेकर, सुनिल गारडे, शिवाजी जाधव, ओम राजबिंडे, गौरव शिरसाठ, संदीप बळी काथोटे काका, बंडू गारडे, शिवाजी देशमुख, किशोर सोळंकी, दिलीप परिहार ,विशाल भागिले , गजानन बावणे ,संदीप जोशी, गणेश आय्या उर्फ रिचर्ड्स आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.
लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या वर्तमानपत्रातील शेवटची कडी म्हणजे घरोघरी वर्तमानपत्र वाटप करणारी मुले या मुलांकरिता एडवोकेट मंगेश व्यवहारे तथा बालाजी अर्बन परिवाराने घरोघरी वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना मोफत रेनकोट देऊन सामाजिक दायित्व निभवल्याचे मत पत्रकार समाधान गाडेकर यांनी यावेळी व्यक्त केले व सर्व वर्तमानपत्र वाटप करणाऱ्या मुलांच्या वतीने त्यांचे आभारही मानले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button