बुलडाणा ते भुमराळा बस वझर आघाव पर्यंत विस्तारित करा – सरपंच रामेश्वर आघाव यांची मागणी
MH 28 News Live, लोणार : बुलडाणा भूमराळा बस फेरीचा नव्याने वझर आघाव पर्यंत विस्तारित करण्याची मागणी वझर आघाव ग्रामपंचायतचे सरपंच रामेश्वर आघाव व इतर सदस्यांनी ग्रामपंचायत मध्ये सदर ठराव घेत विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग बुलडाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद प्रमाणे बुलडाणा आगारातून सकाळी सात वाजता व दुपारी चार वाजता निघणारी बस बुलडाणा भुमराळा बस सेवा हे बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. भुमराळा पासून वझर आघाव हे अंतर अवघ्या पाच किलोमीटर अंतराचे आहे. ह्या रस्त्यावर नवीनच डांबरीकरण झालेले असून रस्ता सुस्थितीत आहे तसेच वझर आघाव हे गाव बुलडाणा जिल्ह्याचे शेवटचे टोक असल्याकारणाने बुलडाणा ते वझर आघाव हे थेट बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीची असून गावातील नागरिक व्यापारी व रुग्णांना या बसचा फायदा होईल या बस मुळे जिल्ह्याचा थेट संपर्क होईल तरी तात्काळ आमच्या मागण्याचा विचार करत सदर बस फेरीचा विस्तार वझर आघावं पर्यंत करण्यात येण्याची मागणी निवेदनात नमूद आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button