
शेतकऱ्यांचे सरकार येताच जून 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीबाबत कार्यवाहीचे आदेश. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले आ. श्वेताताई महाले यांच्या पत्रावर आदेश
MH 28 News Live, मुंबई: चिखली तालुक्यात जुन 2021मध्ये ढग फुटी होऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई महाविकास आघाडी सरकारने अजून पर्यंत दिली नाही . परंतू शेतकरी हित जोपासणारे युतीचे सरकार येताच याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सचिव मदत व पुनर्वसन यांना आ. श्वेताताई महाले यांनी दिलेल्या पत्रावर केले आहे. दि. 16 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आ. श्वेताताई महाले यांनी त्यांना पत्र दिले. यातून चिखली तालुक्यातील खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाईची मदत देण्याची मागणी केली असता वरील आदेश दिले आहे.
आ. श्वेताताई महाले यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गत वर्षी चिखली तालुक्यात दि 16 जून आणि 29 जून रोजी उंद्री , अमडापुर आणि आमखेड , अंबाशी व इतर परिसरात ढग फुटी होऊन प्रचंड अतिवृष्टी झाली होती. यात प्राथमिक अंदाजनुसार दि 16 जूनच्या ढगफुटीने पडलेल्या पावसाने वैरागड, हरणी , अमडापूर मंडळात 100 हेक्टरच्या वर जमिनी खरडून गेली तर 8 विहिरी गाळाने भरल्या. तसेच 2 माती नाला बांध फुटला तर 1 शेततळे खचले तर 90 पाइप वाहुन गेले. दि 29 जूनच्या अतिवृष्टीमुळे पावसाने आमखेड , अंबाशी , रानअंत्री , पिंपळवाडी , देऊळगाव धनगर , रोहडा , गांगलगाव , शेलगाव आटोळ , पाटोदा , एकलरा ,तेल्हारा , चंदनपूर येथील 2856 शेतकऱ्यांच्या 2008 हेक्टर जमीन खरडून गेली . एकूण 75 विहिरी नेस्तनाबूत झाल्या . खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी आयुक्त अमरावती मार्फत शासनास सादर करण्यात आलेला आहे.
मविआ सरकारने जाणीव पूर्वक मदतीपासून वंचित ठेवले – आ. सौ. श्वेताताई महाले
चिखली तालुक्यात जुन 2021 मध्ये झालेल्या आणि परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान होऊन ही केवळ राजकिय व्देषपोटी चिखली मतदार संघातील शेतकऱ्यांना महा आघाडी सरकारने जाणीव पूर्वक मदती पासुन वंचीत ठेवले होते . काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने कायमच विदर्भावर अन्याय केलेला आहे. कोणतीही मदत देताना आघाडी सरकारने विदर्भाच्या तोंडाला पाने पुसलेली आहे . चिखली तालुक्यातील बाधित शेतकरी हे अतिवृष्टीच्या मदतीसाठी निकशात बसत असताना ही सरकारने त्यांना मुद्दामहून मदत दिली नाही . यासाठी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी विधानसभेत आवाज उठविला होता . तसेच मदत मिळाली नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. तसेच चिखली तहसीलदार कार्यालयावर बाधित शेतकरी व महिलांचा भव्य आसूड मोर्चा काढला आहे. एव्हढा मोठा प्रचंड शेतकरी आणि महिलांचा आक्रोश झालेला असताना ही गेंड्याची कातडी पांघरलेल्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत मदतीपासून वंचित ठेवले होते परंतु आता युतीचे सरकार आल्याने शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून लवकरच खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी केले आहे.
त्यामूळे चिखली तालुक्यात दि १६ जून आणि २९ जून रोजी झालेल्या ढग फुटी होऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई साठी सरसकट मदत जाहिर करावी अशी देखील मागणी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी पत्रात केली आहे.
अंबाशी व आमखेड तलावाच्या दुरुस्तीची सुद्धा तातडीने कार्यवाही करा
या अतिवृष्टीमुळे चिखली तालुक्यातील आमखेड व अंबाशी या दोन तलावाचे फार मोठे नुकसान झाले आहे . या तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सुद्धा शासनास सादर करण्यात आले आहे. परंतु त्यांच्या दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही त्यामुळे सदर तलावांच्या दुरुस्तीसाठीची कार्यवाही तातडीेने करण्याचे निर्देश ही मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे साहेब यांनी यावेळी दिले . यासाठी सुद्धा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन सदर तलावाच्या दुरुस्तीसाठी मागणी केली आहे.
दि. २९ जून रोजी रोजी झालेल्या ढग फुटी होऊन अतिवृष्टीमुळे अंबाशी आणि आमखेड ता. चिखली जि बुलडाणा येथील तलाव काही वेळातच पूर्णपणे भरून तलावाच्या भिंतीवरून पाणी वेगाने वाहू लागले त्यामुळे आमखेड येथील येथील तलाव फुटला तर अंबाशी येथील पाझर तलावाची लांबीतील भिंत पूर्णपणे खचली. दोन्ही तलावांच्या दुरुस्ती साठी तातडीने निधीची तरतूद करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या संबंधीचा दुरुस्तीचा परिपूर्ण प्रस्ताव कार्यकारी अभियंता , जिल्हा परीषद सिंचन विभाग बुलडाणा यांनी अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता जलसंधारण विभाग यांचे मार्फत (जल १) यांच्या कडे सादर करण्यात आलेला आहे. परंतू अद्याप दुरुस्तीस मान्यता मिळालेली नाही.सदर प्रस्तावास तातडीने मान्यता देउन सदर दोन्ही तलाव तातडीने दुरूस्तीबाबत तात्काळ कार्यवाहीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिल्याने आंबाशी आणि आमखेड तलावांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button