
आत्मनिर्भर किसान अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे ब्रह्माकुमारीज् संस्था भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर शेतकरी अभियानाअंतर्गत ब्रह्मकुमारी संस्थांच्या वतीने शेलगाव देशमुख येथील शेतकरी बांधवांना उदबोधन करण्यात आले. राज योगिनी ब्रह्मकुमारी ज्योती दीदी ग्राम विकास अभियान सदस्य रिसोड, सुषमादीदी, विजयभाई माजी प्राचार्य नागपूर, रामभाई मधुबन निवासी राजस्थान यांच्यासह ब्रह्मकुमारी संस्थांचे सदस्य यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीने आत्मनिर्भर किसान अभियान रॅलीचे स्वागत उपसरपंच विलास कड्डक, महादेव कड्डक एकनाथ खरात, विनोद गोरे, गजानन नरवाडे आदींनीस्वागत केले. आत्मनिर्भर किसान अभियानाअंतर्गत उपस्थित शेतकरी व गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना ब्रह्मकुमारी संस्था खामगावच्या सुषमा दीदी म्हणाल्या की दिवसेंदिवस शेतामध्ये आपण रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा वापर करून शेती करीत आहोत. त्यामुळे शेतीचे उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे असेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आत्मिक व आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार प्रसार करणे, तणावमुक्त जीवनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, दिवसेंदिवस शेतकरी शेतमजूरामध्ये वाढत चाललेली नकारात्मकता, व्यसनाधीनता नियंत्रित ठेवण्यासाठी ईश्वरीय संदेश असलेल्या अध्यात्मिकतेकडे लक्ष केंद्रित करणे या उद्देशाने अभियान गावागावात राबविल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आव्हान सुषमादीदी यांनी केले.



