
जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठानतर्फे 14 आँगस्टला रक्तदान शिबीर
MH 28 News Live, चिखली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दि. 14 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय व सामाजिक कार्यामध्ये सदैव सहभागी होणाऱ्या स्थानिक जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समर्पण संघ कार्यालय, गांधीनगर येथे दि. 14 ऑगस्ट रोजी हे शिबिर संपन्न होत असून सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रक्तदानाचा हा उपक्रम चालणार आहे. या उपक्रमात चिखली नगरातील राष्ट्रप्रेमी नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्हि. डी. पाटील व सचिव अरविंद असोलकर यांनी केले आहे.