नवीन कामगार कायद्यातील सुट्ट्यांबाबत केंद्र सरकारने केले हे स्पष्टीकरण
MH 28 News Live : नवीन कामगार संहितेबाबत बऱ्याच दिवसांपासून अनेक बातम्या येत आहेत. ज्यामध्ये आठवड्यातून चार कामकाजाच्या दिवसांनंतर तीन दिवसांच्या सुट्टीच्या चर्चेचा समावेश आहे. परंतु, कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, चारही नवीन श्रम संहितांमध्ये चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
२५ ऑगस्टपासून तिरुपती येथे सुरू होणाऱ्या कामगार मंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील. राज्यांच्या कामगार मंत्र्यांच्या या परिषदेच्या अजेंड्यामध्ये चारही कामगार संहितांबाबत राज्य सरकारांकडून नियमांच्या मसुद्यावर चर्चा समाविष्ट आहे, अशी माहिती कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मोबदला संहितेबाबत नियमांचा मसुदा तयार केला आहे. २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सामाजिक सुरक्षा संहितेबाबत नियम तयार केले आहेत. २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी औद्योगिक संबंध संहितेवर नियमांचा मसुदा तयार केला आहे आणि २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी व्यावसायिक सुरक्षा संहितेवर नियमांचा मसुदा तयार केला आहे.
केंद्र सरकारला आशा आहे की सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सर्व चार कामगार संहितांवर नियम तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. जेणेकरून ते देशभर लागू केले जातील
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button