♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावरील लोणार – सिंदखेडराजा – देऊळगावराजा परिसरातील वाहतूक उद्या तासभर बंद जालना हद्दीत गॅन्ट्री बसवण्याचे काम

MH 28 News Live : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) उभारणीच्या कामाला वेग आला असून, त्याअंतर्गत मंगळवारी (दि. २८) दुपारी १२ ते १ या वेळेत बुलढाणा – जालनादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा परिसरातून जाणाऱ्या मुंबई वाहिनीवरील वाहतूक तासाभरासाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.

एमएसआरडीसीकडून समृद्धी महामार्गावरील वाहतुकीचे व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. या प्रणालीमुळे वाहतुकीचे प्रभावी नियमन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना अधिक सक्षमपणे राबविता येणार आहेत. या प्रकल्पासाठी कोरियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या कामाचा भाग म्हणून महामार्गावर विविध ठिकाणी गॅन्ट्री उभारल्या जात असून, त्यासाठी आवश्यकतेनुसार वाहतूक ब्लॉक घेतले जात आहेत. मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तसेच जालना जिल्ह्यातील साखळी क्रमांक ३२२ ते ३५१.९०० दरम्यान मुंबई वाहिनीवर गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे.

काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल. दरम्यान, मंगळवारी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी नियोजन करून पर्यायी वेळ अथवा मार्गाचा विचार करावा, तसेच संबंधित सूचनांचे पालन करावे, असे आवाहन एमएसआरडीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129