
नातवाने केली आजोबांची स्वप्नपूर्ती. नीट परीक्षेत मेहुल तोष्णीवालचे घवघवीत यश
MH 28 News Live, लोणार : स्थानिक माहेश्वरी समाजाचे जिल्हा कोषाध्य्क्ष तथा पत्रकार गोपाल तोष्णीवाल आणि माजी नगरसेविका शैला तोष्णीवाल यांचा मुलगा मेहुल याने नीट परीक्षेत 628 गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले. त्याचे आजोबा जगन्नाथ तोष्णीवाल यांचे एक स्वप्न होते की मुलगा किंवा नातू डॉक्टर व्हावे, मेहुलने नीटच्या निकालात यश मिळवून त्याच्या आजोबाची स्वप्नपूर्ती केली डॉक्टर बनून समाजसेवा करणार आहे. मेहुल आपल्या यशाचे श्रेय त्याच्या आजी-आजोबा, मामा आशिष, गोपाल लड्डा तसेच श्वेता सिंगी आणि केला मॅडम व डॉ.आर. एन. लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक तसेच अध्यक्ष याना देतो. या शैक्षणिक यशाबद्दल त्याचा माहेश्वरी समाज, चिखली अर्बन बँक तसेच वीज क्षेत्रातील मान्यवरनी सत्कार केला.