महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय दे. माळीच्या प्रकल्पाची राज्यस्तरासाठी निवड
MH 28 News Live, मेहकर : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2021 – 22 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये उपकरण निर्मिती या विभागात आरोग्य व स्वच्छता या विषया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या सार्थक रामचंद्र शिंदे याचा प्रथम क्रमांक आला असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तो पात्र ठरला. आहे.
वर्ग ९ ब मध्ये शिकणाऱ्या सार्थक याने रस्ता सफाई यंत्र हे उपकरण निर्माण केले होते प्रचलित काळातील स्वच्छतेची गरज लक्षात घेता हे उपक्रम समाजासाठी व देशासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन परीक्षकांनी केले. प्रथम क्रमांक आल्याबद्दल विद्यार्थ्याचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ .अनिलकुमार गाभणे, उपाध्यक्ष दि. स. अंभोरे, सचिव किशोर गाभणे, महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ बाहेकर, पर्यवेक्षक एम व्ही गाभणे यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय साठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या उत्तम यशाबद्दल परिसरात व जिल्ह्यात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button