
युवकाची महाराष्ट्र एक्सप्रेससमोर आत्महत्या
- MH 28 News Live, नांदुरा : समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेस समोर येऊन एक इसमाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९ . ३० च्या सुमारास घडली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस शेगावचे सुनील कवळकर गजानन मेटांगे आरपीएफ झनके व ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर पियुष मिहानी हे रुग्णवाहिका
घेऊन घटनास्थळी पोहचले. तेथे मिळालेल्या मोबाईल मधील नंबर वरून मृतकाची ओळख पटवली. मृतक मुलगा हा येरळी येथील दिपक लक्ष्मण काकने ( २८ ) हा असल्याचे निष्पन्न झाले. लोहमार्ग पोलीस स्टेशन शेगाव येथे मर्ग नंबर ३०/२२ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे दाखल केला. घटनास्थळावरून वरून प्रेत ओमसाई फाउंडेशनच्या स्वयंसेवक यांनी रुग्णवाहिकेपर्यन्त आणून सरकारी दवाखाना नांदुरा येथे पोहचवले. ओमसाई फाउंडेशन नांदुराचे विलास निंबोळकर, पीयुष मिहानी, श्रीकृष्ण वसोकार यांनी लोहमार्ग पोलिसांना सदर कार्यवाहीत मदत केली. मृतकाच्या आत्महत्येबाबत पुढील तपास लोहमार्ग पोलीस सुनील कवळकर करीत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button