♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एका दिवसात विद्यार्थ्यांना मिळाले जातपडताळणी प्रमाणपत्र

MH 28 News Live, बुलडाणा : शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक असणारे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी प्रमाणपत्र देऊन समितीने गतीमानतेचा परिचय दिला. जातपडताळणी समितीने केलेल्या कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याने या कार्याचे कौतुक होत आहे.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर सामान्यांची अडलेली कामे तातडीने होऊ शकतात. असाच सुखद अनुभव जिल्हा जातपडताळणी समिती बुलडाणा विभागात शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आला.

विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने व्यवसायिक अभ्यासक्रम सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेताना अडचण निर्माण झाली. या पाच विद्यार्थ्यांनी ऐन शेवटच्या दिवशी जातपडताळणी कार्यालयात अर्ज दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जातपडताळणी समितीने त्याच दिवशी निर्णय घेऊन अर्ज निकाली काढले. एका दिवसात विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळाले.

एकाच दिवसात प्रमाणपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणे सुकर झाला आहे. मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आलेली अडचण दूर करण्याचे दायित्व घेतल्याबद्दल समितीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे, असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129