वाहतुक सुरू होण्याआधीच सिमेंट रस्त्याला भेगा. दुरुस्ती न झाल्यास अधिकार्याच्या कार्योलयात बसणार. – सुबोध सावजी
MH 28 News Live, डोणगांव : येथून जवळच असलेल्या ग्राम पांगरखेड ते बेलगाव रस्ता रस्त्याचे काम सुरू आहे सदर काम संथ गतीने व निक्रृष्ठ दर्जा चे सुरू आहे कारण सदर रस्त्यावर वाहतुक सुरू होण्याआधीच सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या चे दिसुन येत आहे तर टाकलेले डांबरीकरण हे पायाने उखळत आहे याबाबत लोकमत ला बातमी प्रसिद्ध होताच दि. 21 नोव्हेंबर ला माजी राज्यमंत्री सुबोध सावजी तसेच लक्ष्मणराव दांदडे वामनराव देशमुख सह बेलगाववासियांनी सदर रोडवर जाऊन पाहणी केली असता सदर सिमेंट रस्तावर वाहतुकीआधीच भेगा पडलेल्या दिसुन आल्या तर पुलाखाली गज न टाकल्याने एखाद्या अनर्थ होण्याची शक्यता आहे याबाबत सुबोध सावजी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुलाबराव शेळके यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व सदर काम हे अधिकारी यांच्या दुर्लक्ष पणामुळे होत आहे याकडे आपण लक्ष न दिल्यास व सदर कामाची चौकशी न झाल्यास अधिकारी यांच्या कार्योलयात बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सदर काम फार संथ गतीने सुरू असुन अधिकारी यांचे दुर्लक्ष यामुळे सदर रस्ता हा निक्रृष्ठ दर्जाचा होत असल्याने आता काय कारवाई होते याकडे बेलगाव वासियांचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button