निवडणुक कर्तव्य टाळणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा: तहसीलदार सैपन नदाफ
MH 28 News Live, लोणार : तालुक्यामध्ये 39 ग्रामपंचायती करीता 121 मतदान केंद्रावर दि. 18 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. सदर निवडणुकीसाठी शासकिय कार्यायातील अधिकारी कर्मचारी पंचायत समिती व इतर अनुदानित शाळातील शिक्षकांची मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणुन निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार लोणार यांनी नेमणूक केली असुन यापैकी बरेच कर्मचारी व शिक्षक यांनी वेगवेगळी कारणे देऊन निवडणूक कर्तव्य टाळण्याचा प्रयत्न केला व इलेक्शन डयुटी रदद करण्यासठी वैदयकिय प्रमाणपत्र जोडुन डयुटी रदद करण्यासाठी अर्ज केला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची अकोला येथील वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी करुन घेण्याचे आदेश तहसिलदार सैफन नदाफ यांनी संबंधित विभाग प्रमुख यांना दिला आहे व.
जे कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहीले आहेत. अशा गैरहजर राहीलेल्या मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण पुनश्च दि. 18 डिसेंबर रोजी ठेवण्यात आले असुन निवडणूक कर्तव्य टाळणार्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत लोणार तहसीलदार कर्तव्यदक्ष तहसिलदार सैफन नदाफ लोणार यांनी दिले आहेत. प्रशिक्षणास गैरहजर राहीलेल्या कर्मचारी यांनी दि. 16 डिसेंबर रोजी पुनश्च प्रशिक्षण घेऊन निवडणूक कर्तव्य पुर्ण करण्याचे आवाहून तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी सैफन नदाफ यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button