♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एसटी बस मध्ये चढुन विद्यार्थिनींची छेडछाड व मारहाण. सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

MH 28 News Live, जळगाव जामोद : जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या खांडवी येथे दिनांक 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी जळगाव जामोद आगाराची वडोदा करिता जाणारी एसटी बस खांडवी येथे थांबली असता तेथील आरोपी विशाल डोंगरदिवे, अजय डोंगरदिवे, रोशन पंढरी डोंगरदिवे, विकास साहेबराव डोंगरदिवे व इतर दोन या सहा जणांनी बसमध्ये चढून विद्यार्थिनींची छेड काढून मारहाण केली. त्यांच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की वडोदा तालुका मुक्ताईनगर येथील जळगाव जामोद येथे शिक्षण घेत असलेल्या काही मुलीने जळगाव ठाण्यात तक्रार दिली होती. मागील काही दिवसापूर्वी जळगाव जामोद ते मुक्ताईनगर बस बंद झाल्यामुळे त्यांनी जळगाव जा. डेपोमध्ये बस सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यामुळे वडोदा येथील विद्यार्थ्यांसाठी चार वाजून 45 मिनिटांनी बस सेवा सुरू करण्यात आली. 15 डिसेंबरला संध्याकाळी वडोद्यासाठी बस लागली असताना त्यामध्ये खांडवी येथील मुले व मुली बसल्याने वडोदा येथील मुलींना बसण्यासाठी जागा नव्हती म्हणून फिर्यादी विद्यार्थ्यीनीने म्हटले की आम्हाला जाण्यासाठी ही एकच बस आहे तुम्ही खांडवीचे विद्यार्थी दुसऱ्या बस ने या असे म्हटले होते. यावेळी गावातील धनेश फुसे यांनी मुलींना सांगितले की वाद घालू नका. परंतु 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास फिर्यादी व तिच्या सोबतची मुले व मुली वडोदा जाण्यासाठी जळगाव येथून बस मध्ये बसले. बस खांडवी येथे बस स्थानकावर थांबली असता तेथे आरोपी विशाल डोंगरदिवे, अजय डोंगरदिवे, रोशन पंढरी डोंगरदिवे, विकास साहेबराव डोंगरदिवे आणि दोन अनोळखी मुले एसटी बस मध्ये चढली. त्यांनी वडोदा येथील विद्यार्थ्यांसोबतच्या धनेश सुनील फुसे यास मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी विद्यार्थ्यीनीने त्यांना म्हटले की ” तुम्ही त्याला कशाला मारहाण करत आहात ” तेव्हा आरोपींनी फिर्यादी विद्यार्थी मुलीसह इतर मुलींना सुद्धा मारहाण करून केस व ओढणी ओढून वाईट उद्देशाने या मुलीच्या अंगाला हात लावून छेडछाड केली. यावेळी खांडवी बस स्थानक येथे उभे असलेले तेजस दहिया हे मुलींना वाचवायला आले असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. आरोपींनी वडोदा जाणारी एसटी बस खांडवी वरून जाऊ देणार नाही अशी धमकी दिली ह्या फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध कलम 354 ,354 A,343,323,504 सहकलम बाल लैंगिक संरक्षण कायदा 8,13 नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129