
खा. अमोल कोल्हे यांची कृषी मित्र सचिन बोंद्रे यांनी घेतली भेट
MH 28 News Live, चिखली : संबंध महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्यातील मुख्य अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांची काल बुलढाणा येथील शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता. ग्रामदैवत आई रेणुका मातेच्या चिखली नगरी येथे कृषी मित्र माजी नगरसेवक सचिन जी बोंद्रे यांनी भेट घेतली. सामाजिक राजकीय कृषी विषयांवर सविस्तर भेट घेऊन चर्चा केली.
महाराष्ट्रातील अविकसित प्रश्नांवर प्रामुख्याने देशाच्या सर्वोच्च सभागृहात शेतकऱ्यांप्रतिच्या मागण्या कृषी मित्र सचिन बोंद्रे यांनी कोल्हे त्यांच्या समोर मांडल्या. लवकरच शेतकऱ्यांच्या हित्याच्या न्याय्य मागण्यासाठी आपण सभागृहात मागणी करू अशी ग्वाही त्यांनी दिली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर खा. अमोल कोल्हे यांनी खास स्नेहभोजनाचा आनंद सुद्धा घेतला. यावेळी गणेश धुंदळे, अमोल सुरडकर व्यंकटेश बोंद्रे, ओम दुकानदार यांचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांना मानणारा चाहता वर्ग उपस्थित होता.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button