
लग्न उरकताच नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
MH 28 News Live, लोणार : तालूक्यातील कुंडलस येथील नागेश माधवराव काकडे यांचा मुलगा विशालचा विवाह सोहळा नेताजी रंगनाथ काटकर यांची मुलगी सौ. कां, डॉ. श्वेता हीच्याशी १८ डिसेंबर रोजी दुपारी लोणार येथे गौरज मुहुतीवर द्वारकाप्रसाद व्यास महाराज यांच्या मंगलमय अष्टकाने पार पडला.
अक्षता पडताच, लग्न समारंभ संपन्न होताच वर विशाल नागेश काकडे यांनी वधु चि. सौ. कां. श्वेता व कुंडलसचे माजी उपसरपंच गजानन मापारी यांना सोबत नेऊन पिंपळनेर येथील जिल्हा परीषदेच्या शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान करने हा सर्वाचा हक्क आहे. एक मत इतीहास घडवीते याची चर्चा आजूबाजूला मतदार करीत होते. यावरुन एक मत किती अनमोल आहे हे दिसून येते. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या एका-एका मताला किती किमत असते हे निकाला वरून दिसून येतेच चूरशीच्या निवडणुकीत या एका मताची किंमत उमेदवाराला ही समजते. एवढे मात्र खरे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button