
अट्टल चोर गजाआड, अनेक गुन्ह्यांची दिली कबुली
MH 28 News Live, डोणगाव : येथील स्टेट बँकेच्या शाखेतून कर्ज खात्यातील रक्कम विड्रॉल करण्यासाठी गेलेल्या मेहकर तालुक्यातील नागापूर येथील दामोदर खंदारे यांची 50 हजार रुपये कॅश काऊंटर वरून अज्ञात आरोपींनी पळ काढला होता ही घटना 14 डिसेंबर 2022 रोजी दुपारी तीन ते चार वाजता घडली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज मागून तंत्रज्ञानाचा वापर करून शेवटी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
या प्रकरणात बुलढाणा एलसीबीच्या पथकाने मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील आरोपी दानिश अकील शेख याच्याकडून 50 हजार रुपये जप्त केले तसेच या आरोपीने बुलडाणा जिल्ह्यातील 2 तर अकोला जिल्ह्यात 1 गुन्ह्याची कबुली दिली आहे..
सदर कामगिरी एलसीबी प्रमुख बळीराम गिते यांचे मार्गदर्शनात एपीआय अमित वानखडे, विलासकूमार सानप, मनिष गावंडे,पीएसआय श्रीकांत जिंदमवार, पोलीस कर्मचारी दिनेश बकाले, अजिस परसुवाले, गजानन गोरले, सरीता वाकोडे, मधुकर रगड यांनी केली आहे.