♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ. संजय गायकवाड यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती. जिल्ह्यात स्वागत

MH 28 News Live, बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार व धडाकेबाज नेते धर्मवीर श्री संजय गायकवाड यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. गायकवाड यांच्यावर दि. २३ डिसेंबर रोजी ही जबाबदारी सोपवली.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशाने जिल्ह्यात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून राज्य सरकारची विकासकामे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया आ. संजय गायकवाड यांनी आपल्या नियुक्तीसंदर्भात व्यक्त केली. दरम्यान आ. गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आ. संजय गायकवाड यांच्या नियुक्तीचे जोरदार स्वागत केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129