
लम्पीने घेतला बैलाचा जीव, शेतकरी झाला हवालदिल
MH 28 News Live, उदयनगर : येथून जवळच असलेल्या किन्ही सवडत येथे लम्पी आजाराने बैल दगावल्याची घटना १७ डिसेंबर रोजी घडली. यामुळे शेतकरी संतोष सवडतकर यांचे अंदाजे ५५ हजार नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पाळीव जनावरांना लम्पी साथरोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील काही दिवसांपासून उदयनगर येथे देखील जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली होती. तेंव्हा पासून स्थानिक पशवैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. शुक्ला यांचे पशुधनावर उपचार सुरू होते. अखेर लम्पी आजाराने जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुधन मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उदयनगर परीसरात डॉ. जी.एस शुक्ला यांनी जनावरांचा उपचार करुन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी संबंधित शेतकऱ्याचा बैल दगावला असून शेतकरी हवालदिल झाला असून शासकीय मदतीची अपेक्षा करत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button