पतसंस्था फेडरेशनच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड
MH 28 News Live, बुलढाणा : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी उर्वरित चारही अर्ज बुधवारी मागे घेतले गेल्याने ही निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध झाली.
फेडरेशनच्या 21 जागांसाठी विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे उदय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनेलच्या 21 जणांसह एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी 72 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. कोयटे यांनी जोशी यांच्याशी चर्चा करून अंतिम 21 जणांची नावे उमेदवारीसाठी जाहीर केली होती.
त्यातील भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, महिला आरक्षित प्रवर्ग आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एकमेव अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. मात्र, सर्वसाधारण प्रवर्गातून 16 जागांसाठी 20 अर्ज होते. हे अतिरिक्त चार अर्ज बुधवारी माघारीच्या अंतिम दिवशी मागे घेतले गेल्याने ही निवडणुक बिनविरोध झाल्याचे काकासाहेब कोयटे यांनी सांगितले आहे. फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष असलेले काकासाहेब कोयटे यांनी 1990 सालापासून संचालक, सहसचिव, महासचिव या पदांवर काम केले असून गेली 14 वर्षे ते अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. राज्यभर 16 हजार पतसंस्थांचे नेतृत्व करणार्या या संस्थांचे सव्वा दोन कोटी सभासद असून दोन लाखांवर पदाधिकारी आहेत.
या 16 हजार संस्थांच्या तब्बल 50 हजार शाखा आहेत. त्यातील दोन लाख दैनंदिन ठेव प्रतिनिधीमार्फत राज्यभरातील एक कोटी कुटुंबांशी म्हणजेच सुमारे तीन ते चार व्यक्तीशी या पतसंस्था चळवळीचा संपर्क येतो. फेडरेशनचे शिर्डी येथे स्वतचे अद्यावत प्रशिक्षण केले आहे. बिनविरोध निवड झालेले ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे (अमदनगर), वसंत शिंदे (मुंबई), राधेश्याम चांडक (बुलढाणा), दादाराव तुपकर (जालना), डॉ. शांतीलाल सिंगी ( औरंगाबाद), शशिकांत राजोबा (सांगली), चद्रकांत वंजारी (ठाणे), अॅड. दिपक पटवर्धन (रत्नागिरी), धनंजय तांबेकर (नांदेड), रवींद्र भोसले (सातारा), जवाहर छाबडा (कोल्हापूर), भास्कर बांगर (पूणे), वासुदेव काळे (अहमदनगर), सुभाष आकरे (गोदिया), निलिमा बावणे (नागपूर), नारायण वाजे (नाशिक), राजूदास जाधव (यवतमाळ), भारती मुथा (पुूणे) व शरद जाधव (पालघर)यांचा समावेश आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button