
रोड राँबरी करणारे ते पाच आरोपी बुलढाणा एलसीबीने केले गजाआड
MH 28 News Live, बुलढाणा : अमडापूर पोलिस ठाण्याअंतर्गत रस्त्यावर थांबलेल्या कारचे काच फोडून चाकूचा दाखवून मोबाईल सह रोख रक्कम लांबविणार्या 5 आरोपींना बुलढाणा एलसीबी पथकानें सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे.
अमडापूर रोडवरील पेठ शिवारात 11 डिसेंबर रोजी प्रशांत अशेाक वाकीकर रा. खामगांव यांच्या उभ्या कारचे काच फोडून चाकूचा धाक दाखवून एक मोबाईल व 2 हजार 500 रूपये हिसकावून पाच आरोपी पळून गेेले होते. याबाबत फिर्यादीने अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरविले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासणीच्या आधारे पाचही आरोपीना ताब्यात घेण्यात आले. सतीश गायकवाड, परसराम जाधव, वैभव गावंडें, कृष्णा भोपळे, गजानन प्रसाने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराम गिते यांच्या आदेशानुसार अमित वानखडे, मनीष गावंडे, विलास सानप, सुधाकर काळै, सुनील खरात यांची उपस्थिती होती.