
अनाथ, अपंगांचे सेवेकरी संत गाडगे महाराज – प्रल्हाद इंगळे गुरुजी साळवे परीवाराकडुन वृध्दांना औषधीचे वाटप
MH 28 News Live, चिखली:- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे राष्टसंत गाडगे बाबा व पेरीयार रामास्वामी नायकर यांच्या स्मृतीदिनानीमीत्त अभिवादन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब साळवे सोहम लॅब सिंदखेड राजा हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक माजी प्राचार्य प्रल्हाद इंगळे गुरुजी हे होते. तर प्रमुख उपस्थीतीत रमेश डोंगरदिवे, विरेंद्रकुमार डोंगरदिवे, अनिल सोळंके हे होते.
अनाथ, अपंगाचे सेवेकरी संत गाडगे महाराजांनी गावोगावी पायी फिरून दिवसा स्वच्छता तर रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ केली. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अच्छतेच्या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेल्या गाडगे महाराजांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले होते.परंतु ते कोठेही डगमले नाही. आणी त्यांचाच आदर्श डोळयासमोर ठेऊन तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची वाटचाल सुरु आहे. असे मत प्रल्हाद इंगळे गुरुजींनी व्यक्त केले. तसेच बाबासाहेब साळवे व सौ वर्षाताई साळवे यांनी वृध्द प्रकल्पाला नियमीत वापरातील गोळया औषधी वाटप केल्या.
सुत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे तर आभार प्रदर्शन सौ रुपालीताई डोंगरदिवे यांनी केले. यावेळी रवीशंकर डोंगरदिवे, प्रकाश डोंगरदिवे, गणेश डोंगरदिवे, संजय डोंगरदिवे, अवचितराव डोंगरेदिवे, भास्कर डोंगरदिवे, रीतेश डोंगरदिवे, उत्तम डोंगरदिवे, राहुल घेवंदे, राहुल डोंगरदिवे, प्रियंका वानखडे, पंजाब डोंगरदिवे, संगीता वानखडे, समाधान डोंगरदिवे, कावेरी डोंगरदिवे, दुर्गाबाई साबळे यांच्यासह वृध्द प्रकल्पातिल वृध्द व समाज बांधव उपस्थित होते.