
पशुपालकांनो, लम्पी चर्म रोगाचे पशूधनाचे नुकसान झाल्यास पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करा
MH 28 News Live, बुलडाणा : लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशूधनास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पशूपालकांनी पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
लम्पी चर्म रोगाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधन नुकसान भरपाई देण्यासंबंधी ऑनलाईन प्रणालीनुसार mhpashuaarogya.com या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ॲप पशूसहायता PASHUSAHAYATA वर नोंदणी करुन नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यात यावेत. पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:च्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्यामुळे अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. ऑनलाईन अर्ज तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, विस्तार, पंचायत समिती यांच्याकडून कार्यक्षेत्रातील संबंधित पशूधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, यांना युजर आयडी पासवर्ड निर्धारित करुन फॉरवर्ड करण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशूसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button