
आ. श्वेताताई महाले आणि २७ डिसेंबरचा योगायोग
MH 28 News Live, चिखली : आ. श्वेताताई महाले यांनी २०१९ च्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २७ डिसेंबर २०१९ रोजी २५१५ तसेच इतर प्रस्तावीत कामावर दिलेली स्थगिती उठविण्यात यावी तसेच विदर्भाच्या मागासलेपणावर व सिंचन अनुशेषाकडे लक्ष वेधले होते . वैनगंगा ते नळगंगा नदीजोड ह्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजछरी दिलेल्या योजनेमध्ये पैनगंगा नदीजोडणी केल्यास त्याचा फायदा बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील गावांना होईल, त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची मागणी आघाडी सरकारकडे केली होती. परंतु, आघाडी सरकारने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र योगायोग असा की २७ डिसेंबर २०२२ रोजीच आ. श्वेताताई महाले यांच्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देऊन
वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पात पैनगंगा प्रकल्प जोडण्याची घोषणा केली. प्रश्न विचारल्यापासून बरोबर दोन वर्षानी याबाबत घोषणा होणे हा देखील एक योगायोगच म्हणावा लागेल असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार
विरोधी पक्षाच्या नियम 293 नुसार चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे अध्यक्ष महोदय सर्वप्रथम त्यांनी या विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून विरोधी पक्षाच्या लोकं प्रतिनिधींनी त्या ठिकाणी विदर्भावरती कशा पद्धतीने अन्याय झाला हे त्या ठिकाणी मांडलं. आणि ऐकत असताना सदस्य विरोधी पक्षातले हे विसरले की गत पाच वर्षाचा कार्यकाळ सोडला तर कायम विरोधी पक्षच त्या ठिकाणी सत्तेमध्ये होता. परंतु सत्तेत असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीने कायम विदर्भावर अन्याय कशा पद्धतीने करता येईल अशी भूमिका ठेवली असल्याचा जोरदार प्रहार श्वेताताई महाले यांनी केला. आज खऱ्या अर्थाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना संजीवनी देणारा वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प मान्यता पावला त्यामुळे विदर्भातला शेतकरी आज धन्य होईल अशी आशा आ. श्वेताताई महाले यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली.