
हिंदूराष्ट्र सेनेच्या शहर प्रमुखपदी हरीहर सोळंके यांची नियुक्ती
MH 28 News Live, चिखली : हिंदूत्वाच्या विचारातून युवकांचे संघटन करून युवा शक्तीला विधायक कार्याकडे वळवण्याचे कार्य करणाऱ्या हिंदूराष्ट्र सेनेच्या चिखली शहर प्रमुख पदावर येथील सामाजिक कार्यकर्ते हरीहर सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक धनंजयभाई देसाई यांच्या उपस्थितीत दि. २ जानेवारी रोजी जिल्हा प्रमुख विजय पवार यांनी सोळंके यांची नियुक्ती केली.
मागील १५ वर्षांपासून हरीहर सोळंके हे सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असून अनेक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे. याशिवाय विविध संघटनांमध्ये सोळंके यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या कार्याची दखल घेऊन हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख विजय पवार यांनी त्यांची चिखली शहर प्रमुख या पदावर नियुक्ती केली. संघटनेचे संस्थापक धनंजयभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हरीहर सोळंके यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. देव, देश आणि धर्माच्या कार्यात आपण निष्ठेने काम करु आणि संघटनेने दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडू अशी प्रतिक्रिया हरीहर सोळंके यांनी आपल्या नियुक्तीसंदर्भात व्यक्त केली आहे.