
MSSC : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी
MH 28 News Live : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२३ आहे.
एकूण रिक्त पदे : ०१
रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/ स्वीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विद्याशाखेची पदवी. ०२) अनुभव – स्टेनो कम पर्सनल म्हणून राज्य/केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त सहाय्यक ०३) MS-CIT प्रमाणपत्र.
वयाची अट : ३१ जानेवारी २०२३ रोजी ६५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.
निवड पद्धत :
१. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे कळविण्यात येईल.
२. मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
३. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.
४. दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने ०१ वर्षासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार नुतनीकरण करण्यात येईल.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005
अधिकृत संकेतस्थळ : www.mahasecurity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/dqU37