माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणीवर कारवाई, जिल्ह्यात उडाली खळबळ !
MH 28 News Live, चिखली : बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेचे २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या थकीत कर्ज प्रकरणी येथील श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीविरुध्दच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणीवरील या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय व सहकार चळवळ खळबळ उडाली आहे.
काल दुपार पासून जिल्हा बँकेचे अधिकारी सूतगिरणी वर ठाण मांडून आहेत. या सूतगिरणीवर २५ कोटींपेक्षा जास्त कर्ज असल्याचे समजते. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा बँकेकडून सूतगिरणीवर जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे. राहुल बोंद्रे यांच्या श्री मुंगसाजी महाराज या सूतगिरणी वर जिल्हा बँकेचे २५ कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. वारंवार नोटीस बजावून सूचना करुन बोंद्रे यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. २५ कोटींच्या कर्जाच्या थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. वसुली पथकात बँकेचे १५ अधिकारी कर्मचारी असल्याचे समजते. बँकेच्या विशेष वसुली पथकाने ही कारवाई सुरु केल्याचे समजते. मात्र, बोंद्रे यांनी थकित कर्जातील काहीा रक्कम भरण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे.
पाच वर्षांपासून झाले होती कारवाईला सुरुवात
कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी सप्टेंबर २०१७ मध्ये राज्य सहकारी शिखर बँकेने राहुल बोंद्रे चेअरमन असलेल्या ”श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी”च्या १६ संचालकांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर ठरावीक मुदतीत समाधानकारक उत्तर आले नाहीतर बँकेकडून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह ३१ जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाने इतर थकबाकीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईच्या हालचाल तीव्र केली होती. मधल्या काळात राज्यात काँग्रेसचा सहभाग असलेले महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्याने सदर कारवाई थांबवण्यात आली होती मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button