
माजी पोलिस कर्मचाऱ्याला गिन्न्या देण्यासाठी निर्जनस्थळी बोलावून १२ लाख लुटले
MH 28 News Live, खामगाव :
यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवासी तसेच सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी राजेंद्र चंदुलाल जाधव (५९) यांना काल २५ मार्च २२ रोजी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास गिन्न्या विकत देण्याच्या उद्देशाने अनिल छन्नु भोसले, अभिसन भोसले, दीपक भीमदास चव्हाण, दिनकर चलबाबु भोसले व इतर अंदाजे ८ इसम सर्व रा. अंत्रज ता. खामगाव यांनी बोलाविले होते. यावेळी राजेंद्र जाधव यांना गिन्न्या न देता जबर मारहाण केली व पोटाला चाकू लावून त्यांच्या ताब्यातील मोबाईल सोन्याचे दागिने रिव्हॉल्वर, घड्याळ, नगदी ५ लाख रूपये असा एकूण ११ लाख ६६ हजार ३५० रूपयाचा मुद्देमाल लुटण्यात आला.
सदर घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी अमोल कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या प्रकरणी राजेंद्र जाधव यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३९४ ३९५, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील करण्यात आली व त्यांच्या तपास सुरू आहे.